डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात साजरी केली जाते.
1. मी प्रथम आणि अंतिमत: भारतीय आहे.
2. मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.
3. आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.
4. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे.
5. कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजावी.
6. अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.
7. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
8. धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.
9. माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे
10. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
आंबेडकर जयंतीचा इतिहास
14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.
डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
