ग्रामसेविका राजश्री कदम यांच्या वर्तवणुकीबाबत वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने १ फेब्रुवारी रोजी सरपंचांसह सदस्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. यानंतर तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी ग्रामसेवक देण्यात आला होता. मात्र त्यानंतर काहीच दिवसांत राजश्री कदम पुन्हा भालीवडी ग्रामपंचायतीत रुजू झाल्या. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी भालिवडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच दीपक कारले, ग्रामसेविका राजश्री कदम या काम करीत होते. यावेळी कर्मचारी विजय पिंगळे यांच्याकडे कदम यांनी बँकेत भरणा करायला दिलेल्या रकमेविषयी विचारणा केली. यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला असता खटकले कदम यांनी आक्रमक होत थेट पिंगळे याच्या कानशिलात लगावली.ग्रामसेविकेच्या बदलीची मागणी अनेकदा केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीला टाळेही ठोकले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा भालिवडी ग्रामपंचायतीत रुजू करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी पूर्णवेळ दुसरा ग्रामसेवक द्यावा.- दीपक कार्ले, सरपंच, भालिवडीग्रामसेविका राजश्री कदम यांच्या जागी लगतच्या गावातील ग्रामसेवकांची नियुक्ती भालिवडी येथे केली आहे. तसेच संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.- चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कर्जत
ग्रामसेविकेने लगावली कर्मचाऱ्याच्या कानशिलात भालिवडी ग्रामपंचायत ग्रामसेविकेने थेट कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार आला समोर.
शुक्रवार, एप्रिल १४, २०२३
0
नेरळ - काही महिन्यांपूर्वी ग्रामसेवक बदलून मिळावा या मागणीसाठी सरपंच, सदस्यांनीच ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा रुजू झालेल्या ग्रामसेविकेने थेट कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे भालिवडी ग्रामपंचायतामधील सरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
Tags
