शिंदखेडा तालुक्यातील राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या अकरा जागांचा त्यात समावेश आहे.निवडणुक कार्यक्रम असा : तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे- १८ एप्रिल, नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करणे- २५ एप्रिल ते २ मे (सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत), नामनिर्देशन पत्र छाननी- ३ मे, अर्ज मागे घेण्याची मुदत ८ मेस दुपारी तीनपर्यंत. तर, १८ मेस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान
दरम्यान, महाळपूर ग्रामपंचायतीच्या एक अनुसूचित जमाती, कुंभारे (प्र. नंदुरबार) एक सर्वसाधारण, म्हळसर एक सर्वसाधारण, चिलाणे दोन अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती, तामथरे एक सर्वसाधारण, झोटवाडे एक अनुसूचित जमाती महिला राखीव, चौगाव बुद्रुक एक सर्वसाधारण व दोन सर्वधारण महिला अशा तीन जागा, जखाणे मागास प्रवर्ग महिलेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होईल.
