पती-पत्नीच्या भांडणात शेजारणीचा गेला जीव; फॅनच्‍या दांड्याने मारहाण

फुले शाहू आंबेडकर
0
धडगाव : पती त्यांच्या पत्नीसह मुलांना मारहाण करीत असतांना ते भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेजारी महिलेलाच सिलिंग फॅनच्या लोखंडी रॉडने मारून खून  केल्याची घटना घडली. सदर घटना अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी येथे घडली. याबाबत मोलगी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भांग्रापाणी नंदुरबार येथे ११ एप्रील रात्री अकरा ते बाराच्या सुमारास वसंत होमा वसावे हा त्याची पत्नी व मुलांना राहत्या घरी मारहाण करीत होता. या दरम्‍यान शेजारी राहत असलेली सिंदाबाई सेमट्या वसावे व सेमट्या पारशी वसावे हे भांडण सोडविण्यास गेले. याचा राग येऊन वसंत वसावे याने सीलिंग फॅनच्या लोखंडी मोटारीसह असलेल्या दांड्याने तोंडावर व पायावर मारून गंभीर दुखापत केली.

महिलेचा मृत्‍यू

या मारहाणीत सिंदाबाई सेमट्या वसावे (वय ६०) यांचा मृत्‍यू झाला, तर सेमट्या पारशी वसावे यास देखील गंभीर दुखापत करून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावरून सेमट्या वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलगी  पोलीस ठाण्यात वसंत होमा वसावे याच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default