मुंबई हादरली! मानखुर्दमध्ये २२ वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या; परिसरात खळबळ

फुले शाहू आंबेडकर
0
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून खूनासारख्या भयानक घटना घडत आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सुरू आहे. अशातच मुंबईच्या मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन जणांनी एका महिलेवर गोळीबार केला. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे
मानखुर्दच्या इंदिरा नगर परिसरात शनिवारी (२९ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फरझाना फिरोज (वय २२ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सिंग (वय ५५ वर्ष) आणि त्याचा मुलगा अतीस सिंग (वय अंदाजे २५ वर्ष) या दोन संशयित आरोपींनी फरझाना हिच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते फरार झाले. दरम्यान, फरझाना हिची हत्या का करण्यात आली? याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पोलिस फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default