चौकशीदरम्यान त्याने केलेल्या खुलाशामुळे पोलीसही चकित झाले. त्याने सांगितलं की तो त्याच्या मामीवर खूप प्रेम करतो. याच कारणामुळे त्याने लग्नही केलं नाही.
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं लोकांना महागात पडतं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या झाशीमधून समोर आली आहे. यात एका मुलाने आपल्या प्रेयसीला (मामी) अडकवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला. मात्र, त्याचा हा डाव यशस्वी झाला नाही आणि तो पकडला गेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकही थक्क झाले.
हे प्रकरण झाशीच्या प्रेम नगर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने काही दिवसांपूर्वी एसएसपी कार्यालयात आपला मुलगा मातादीन याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. अपहरणकर्ता 1 लाखांच्या खंडणीसाठी मेसेज करत असल्याचं सांगण्यात आलं. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचंही सांगितलं गेलं.
याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान पोलिसांनाही खंडणीचे मेसेज येऊ लागले. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. तपासाला गती देत पोलिसांनी मातादीनचा शोध सुरू केला. दरम्यान, माहितीवरून प्रेमनगर पोलिसांनी झाशी-ललितपूर महामार्गावरून बसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मातादीनला पकडलं.
चौकशीदरम्यान त्याने केलेल्या खुलाशामुळे पोलीसही चकित झाले. त्याने सांगितलं की तो त्याच्या मामीवर खूप प्रेम करतो. याच कारणामुळे त्याने लग्नही केलं नाही. मामीसोबत बरेच वर्ष अफेअर चालू होतं पण काही महिन्यांपूर्वी मामीने ब्रेकअप केलं आणि त्याच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला.
