नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अनेक नियम बदलले आहेत. आजपासून नवीन आयकर प्रणालीमध्ये नवीन स्लॅब लागू झाले आहेत. यासोबतच आजपासून टोलही महाग झाला आहे. जाणून घ्या 1 एप्रिलपासून काय बदल झाले आहेत
3) नवीन कर स्लॅब लागू : 2023 च्या अर्थ कारण नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅबमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आयकर स्लॅबची संख्या सहावरुन पाच करण्यात आला आहे. तसंच, आता नवीन आयकर व्यवस्था ही डीफॉल्ट व्यवस्था असेल.
4) मूळ सूट मर्यादा 3 लाख रुपये : नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅबमधील बदलांसह, मूळ सूट मर्यादा 3 लाख रुपये करण्यात आली आहे. यात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सर्व व्यक्तींसाठी त्यांचे वय विचारात न घेता सरसकट मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपये होती.
5) स्टॅंडर्ड डिडक्शन : पगारदार व्यक्ती आणि निवृत्तीवेतनधारकांना 50 हजार रुपयांच्या स्टॅंडर्ड डिडक्शनचा लाभ देण्यात येईल. त्याचप्रमाणे, नवीन करप्रणालीची निवड करणारे कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक देखील नवीन कर प्रणाली अंतर्गत 15 हजार रुपयांच्या स्टॅंडर्ड डिडक्शनसाठी पात्र असतील
6) डीफॉल्ट आयकर व्यवस्था : नवीन कर व्यवस्था डीफॉल्ट पर्याय म्हणून केली आहे. याचा अर्थ असा होईल की जर तुम्ही जुन्या कर प्रणालीची निवड केली नाही, तर तुमच्या उत्पन्नावरील आयकर नवीन कर प्रणालीच्या आधारे मोजला जाईल. आयकर कायद्यानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नवीन कर प्रणालीची निवड करणारी व्यक्ती, करपात्र उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त असल्यास किरकोळ सवलतीसाठी पात्र असेल.
7) डेट म्युच्युअल फंड : नवीन आर्थिक वर्षापासून, डेट म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल. डेट म्युच्युअल फंडांवर उपलब्ध असलेला इंडेक्सेशन लाभ काढून टाकला आहे.
8) विमा पॉलिसीमधून मिळणाऱ्या करमुक्त उत्पन्नवर मर्यादा : आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून जीवन विमा पॉलिसींमधून मिळू शकणार्या करमुक्त उत्पन्नावर मर्यादा घालण्यात आली आहे. आयुर्विमा पॉलिसींवर भरलेल्या प्रीमियमची एकूण रक्कम एका आर्थिक वर्षात पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, रक्कम करपात्र असेल.
9) ज्येष्ठ नागरिकांना फायदा : नवीन आर्थिक वर्षापासून, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी (SCSS) कमाल ठेव मर्यादा 15 लाख रुपयांवरुन 30 लाख रुपये करण्यात आली आहे. एका खात्यासाठी मासिक उत्पन्न योजनेसाठी कमाल ठेव मर्यादा 4.5 लाख रुपयांवरुन 9 लाख रुपये करण्यात आली आहे. सोबतच जॉईंट अकाऊंटसाठी ही मर्यादा 7.5 लाख रुपयांवरुन 15 लाख रुपये झाली आहे.
10) एलपीजी सिलेंडरचे दर वाढू शकतात : एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत आज एलपीजी सिलेंडरची किंमत निश्चित होणार आहे. यामध्ये वाढ होऊ शकते.
11) सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक : 1 एप्रिल 2023 पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य झालं आहे. आजपासून फक्त 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. म्हणजेच आता 4 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेले दागिने विकता येणार नाहीत.
12) ऑनलाईन गेममध्ये जिंकलेल्या रकमेवर 30 टक्के टीडीएस : ऑनलाईन गेम जिंकण्यावरुन कर कपातीसाठी यापूर्वी उपलब्ध असलेली सूट सरकारने काढून टाकली आहे. आता जिंकलेल्या रकमेच्या 30 टक्के टीडीएस द्यावा लागेल.
