सतारे येथे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

फुले शाहू आंबेडकर
0
सतारे (ता. शिंदखेडा) येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी संशयितावर शिंदखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रविवारी (ता. १५) रात्री नऊला संबंधित मुलगी गावात मेंदी रेखाटण्यासाठी जाते, असे सांगून घरातून गेली होती. रात्री बारापर्यंत ती घरी आली नाही म्हणून गावात ठिकठिकाणी जाऊन मुलीचा शोध घेतला; परंतु ती मिळून आली नाही.

त्या वेळी समजले, की संशयित जितू छोटू भिल व समाधान पुन्हा भिल हे सकाळपासून गावात फिरत होते. त्यांनीच माझ्या मुलीला  पळवून  नेले असावे, असा संशय आल्याने संशयित राहत असलेल्या (बळसाणे, ता. साक्री) येथे जाऊन जितू भिलच्या घरी गेलो त्या वेळी जितू भिल याचे वडील व छोटू भिल आई भुराबाई छोटे भिल घरी होते. त्यांना मुलीबाबत विचारपूस केली त्या वेळी त्यांनी ‘तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या’ असे फिर्यादीत नमूद केले आहे. या

प्रकरणी संशयित जितू छोटू भिल, छोटू भिल, भुराबाई भिल, समाधान भिल व सागर भिल (सर्व रा. बळसाणे, ता. शिंदखेडा) यांच्यावर शिंदखेडा  पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सदेसिंग तपास चव्हाण करीत आहेत.

सतारे  येथे १६ वर्षीय मुलीला पळवून नेले
शिंदखेडा येथे १६ वर्षीय मुलीला पळवून नेले 

  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default