नाशिकमध्ये सापडले दोघे
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करत संशयितांचा शोध सुरू केला. कोल्हापूर, पुणे, कात्रज अश्या ठिकाणी संशयितांचा गेल्या काही महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते. यातच खबरीमार्फत पोलिसांना दोघा संशयितांचे धागेदोरे हाती लागले होते. त्यानंतर हे दोघे नाशिकच्या सातपूर परिसरात आलेले असल्याची गुप्त माहिती मिळाली. नाशिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सापळा रचून सुमारे ५ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित युवराज मोहन शिंदे आणि देविदास मोहन शिंदे यांना कारसह ताब्यात घेतले.
मुद्देमाल जप्त
त्यांच्याकडून चोरी केलेल्या रकमे पैकी ५३ लाख रोख, चोरीच्या गुन्ह्यातील पैशाने विकत घेतलेली ४ लाख रुपयांची कार, ३० हजार रूपये किंमतीचा मोबाईल, १ हजार रूपये किमतीची ट्रॅव्हल बॅग असा एकूण ५७ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलीस कर्मचारी यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सत्कार देखील करण्यात आला आहे.
