जळगाव जिल्हा दंगलींच्या बाबतीत देश पातळीवर अतिशय कुप्रसिद्ध आहे. जळगाव शहर ,जामनेर, रावेर, अमळनेर, धरणगाव, चोपडा या ठिकाणी मोठ्या स्वरूपावर दंगली मागील काही वर्षात झाल्याच्या नोंदी आहेत.
1970 च्या काळात जळगावत उसळलेली दंगल ही त्यावेळची भारतातील सर्वात मोठी दंगल मानली गेली होती. ८ मे १९७० रोजी केळकर वादातून एका पान टपरीवर झालेल्या भांडणामुळे जळगाववात दंगल उसळली होती. ही दंगल संपूर्ण शहरात पसरली. या दंगलीमध्ये तब्बल 42 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अर्थात 42 हा सरकारी आकडा होता. मात्र प्रत्यक्षदर्शी जळगावकरांच्या मते या दंगलीत जवळजवळ दीडशे जणांचा मृत्यू झाला होता
जोशी पेठ परिसरात सुरू झालेली ही दंगल भीलपुरा, बागवान मोहल्ला, रिधुर वाड्यापर्यंत पोहोचली होती. या दंगली वेळी दंगलखोरांनी लग्नाला आलेल्या एका अख्या वरातीला जाळलं होतं. यात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दंगलीचा वणवा शहरात गतीने पसरला. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. रिधुर वाड्यातील नाल्याच्या काठावर यावेळी प्रसिद्ध असलेला मराठा दरबार अगरबत्तीचा कारखाना दंगल खोरांनी जायला. तब्बल तीन दिवस हा कारखाना धगधगत होता. ही परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे लष्कराला प्राचारण करावे लागले होते. साधारणता तीन दिवस शहरामध्ये संचार बंदी होती. जळगाव शहरात दंगल आटोक्यात आली ही या संचारबंदीनंतरच.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली होती. पुढे केंद्र सरकारने न्यायाधीश डी.पी.मदोन यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव दंगलीसाठी चौकशी आयोग नेमला होता. यावेळी तत्कालीन पोलीस यंत्रणा अपयशी ठरण्याचा आरोप यात करण्यात आला.
जळगाव शहरात एका दैनिकाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अक्षय तृतीयेला शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जळगाव येथे आले होते. यावेळी त्यांची टॉवर चौकात मोठी सभा झाली होती. सभेच्या दुसऱ्या दिवशी जुगार अड्ड्यावर हिंदू मुस्लिम तरुणांमध्ये जुगाराच्या पैशावरून वाद झाला आणि दंगलीला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले भाषण दंगलीचे कारण असल्याचा ठपका माध्यमांनी त्याकाळी ठेवला होता. यामुळे त्यावेळेचे जळगाव जिल्ह्याचे प्रमुख गणेश राणा आणि जयेश कदम या दोघांनी आयोगासमोर बाळासाहेबांच्या भाषणाची कॅसेट ठेवली होती.
२००० साली भुसावळ शहर, अमळनेर या ठिकाणी मोठ्या दंगली उसळल्या. त्यात अनेक जण जखमी झाले. २००१ मध्ये रावेर, जामनेर, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणी दंगली उसळल्या
१७ जून २००१ रोजी रावेर शहरात उसळलेल्या दंगलीमध्ये एक जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. ७ जून २००२ मध्ये जामनेरात उसाळलेल्या दंगलीत सहा जणांना आपला जीव गमावा लागला होता. तर पन्नास हून अधिक जण जखमी झाले होते.
२००४ मध्ये फैसपूर, धरणगाव मध्ये दंगली झाल्या. २००५ मध्ये जळगाव शहरातील जे.के.पार्क येथे दोन गटात चांगलीच हाणामारी झाली होती.. २००६ मध्ये पाचोरा, भडगाव, अमळनेर, जळगाव, रावेर या ठिकाणी पुन्हा एकदा दंगल पाहायला मिळाली. ()
जळगाव शहराचे म्हणायला गेलो तर मास्टर कॉलनी, तांबापुरा, भीलपुरा, शनिपेठ या संवेदनशील जागा म्हटल्या जातात. शिवाजीनगर सह शहरातील अनेक भागांमध्ये छोट्या मोठ्या दंगली अनेक वेळा झाल्या आहेत. रावेर तालुक्यातील चिनावल येथे 27 फेब्रुवारी 2017 रोजी आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्यावरून दंगल उसळली होती.
