या हल्ल्यात अक्षय कवडे व अविनाश झा हे दोन तरुण जखमी झाले आहेत. तर या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात खंजीर उर्फ कुलदीप, राकेश हाजरा, मनीष चौहान, मुकेश हाजरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात अक्षय कवडे व अविनाश झा हे दोन तरुण राहतात. दोन वर्षांपूर्वी अक्षय कवडे याचे मनीष चव्हाण व राकेश हाजरा या दोघांसोबत वाद झाले होते. काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अक्षय कवडे व त्याचा मित्र अविनाश झा हे रिक्षाने मलंग रोडहून घराच्या दिशेने जात होते
याच दरम्यान नांदीवली परिसरातील मेडिकल जवळ उतरून हे दोघे त्यांच्या एका मित्राशी बोलत होते. याचवेळी राकेश हाजरा व त्याचा मित्र खंजीर उर्फ कुलदीप हे दोघे मोटरसायकलवर त्यांच्यादिशेने आले. त्यांच्या दुचाकीवर सफेद रंगाची गोणी होती. अक्षयला पाहताच खंजीर उर्फ कुलदीपने गोणीतून जमिनीवर फेकली व या गोनीतून तलवार काढत तलवारीने अविनाशवर हल्ला केला.
त्याचवेळी मुकेश हाजरा याने अक्षय वर देखील तलवारीने हल्ला केला. तर मुकेश चा साथीदार मनीष चौहान याने अविनाश व अक्षयला दगड फेकून मारले. या हल्ल्यात अविनाश व अक्षय हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले
