त्यांच्याकडून गांजा, दुचाकीसह 36 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माळीवाडा बसस्थानक परिसरात काही इसम त्यांच्या दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी माळीवाडा बसस्थानक परिसरात सापळा लावला असता काही वेळातच तेथे एका दुचाकीवरून दोन इसम त्यांच्याकडील पाठीवरील बॅगेसह सदर ठिकाणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने व ते पोलिसांना पाहून सदर ठिकाणावरून पळून जाण्याचा तयारीत असतांना त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांच्याकडील बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे निदर्शनास आले.
त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांची नावे सुनिल राम पवार व अशोक उत्तम फुलमाळी असे सांगितले. त्यांच्याकडून दोन किलो 26 ग्रॅम व एक दुचाकी असा एकुण 36 हजार 785 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, परि. उपअधीक्षक अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक मनोज कचरे, अंंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, कविता गडाख, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे, हिना बागवान, छाया गायकवाड यांच्या पथकाने केली आहे
