शशिकला प्रदीप जाधव (वय-28) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शशिकला यांच्या बहिणीने सोमवारी (दि.29) सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध आयपीसी 306, 498(अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. शशिकला यांचे पती दिव्यांग असून शशिकला या महापालिकेत (PCMC) कंत्राटी काम करत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला यांचा विवाह पंधरा वर्षापूर्वी झाला असून त्यांना 13 वर्षाचा एक मुलगा आहे. त्या महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करत होत्या. त्यांचे पती दिव्यांग असल्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, सासू आणि दोन नणंदा शशिकला यांना लहान-मोठ्या आणि किरकोळ कराणावरुन शारीरिक आणि मानसिक छळ करत होत्या.
तसेच कपडे घालण्याच्या पद्धतीवरुन, केस विंचरण्यावरुन सतत टोमणे मारत होत्या. शिवीगाळ करत होत्या.
सततच्या त्रासाला कंटाळून शशिकला हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

