याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नंदूरबार जिल्ह्यातील शहादा न्यायालयातुन एक आरोपी फरार झाल्याची घटना घडली समोर आली आहे. शहादा न्यायालयात एका आरोपीला दुपारच्या सत्रात हजर करण्यात आले असता आरोपी पोलिसांना चकवा देत न्यायालया समोर आधीच येवून उभ्या असलेल्या कारमध्ये बसून फरार झाला. क्षणात झालेल्या या प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले. या प्रकारानंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली
न्यायालयातून भरधाव निघालेल्या कारने डोंगरगाव परिसरात एका मोटरसायकल स्वारालाही रस्त्यात उडवले. या अपघातात तरुण जखमी झाला असून त्याला शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे. पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला परंतु तो काही त्यांच्या हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तावडीतून निसटण्यास आरोपी यशस्वी झाला. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा प्रकार असून हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
