भररस्त्यात तरुणीने तरुणावर केला चाकूहल्ला, जळगावचा Video होतोय व्हायरल

फुले शाहू आंबेडकर
0
जळगावमध्ये एका तरुणीने भरदिवसा तरुणावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणीने चाकू हल्ला करत तरुणाला जखमी केले. या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अजिंठा चौकातील ही घटना आहे. एका तरुण आणि तरुणीचा भररस्त्यात गोंधळ सुरु होता. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर संतप्त झालेल्या या तरुणीने पर्समधील छोटा चाकू काढला आणि तरुणावर वार करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत या तरुणीने तरुणाच्या छातीवर वार केले. या चाकू हल्ल्यात तरुण जखमी झाला.
चाकू लागल्यामुळे तरुणाच्या छातीतून रक्त येऊ लागले तरी देखील ही तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत राहिली. यादरम्यान जखमी तरुण या तरुणीच्या हातातला चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत करतो. या वादात तरुण आपल्या अंगावरील शर्ट फाडून टाकतो. या तरुणीला थांबवण्यासाठी रस्त्यावर उपस्थित असलेले लोकं विनंती करत असतात तरी सुद्धी ती ऐकत नाही.

भररस्त्यातील तरुण-तरुणींचा हा वाद पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. याप्रकरणाचा तपास जळगाव पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default