अनैतिक संबंधातून गर्भवती; प्रसूतीनंतर अर्भकाला फेकले गटारीत

फुले शाहू आंबेडकर
0
परतूर तालुक्यातील वाटूर येथून जवळच असलेल्या मंठा तालुक्यातील मोसा गावातील गटारीच्या नाल्यात नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी अर्भक फेकणाऱ्या बाळाच्या मातेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेत हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मले असल्याची धकादायक बाब समोर आली आहे
जालना जिल्‍ह्यातील मोसा गावात शनिवारी सकाळी एका नाल्यात स्त्री जातीचे अर्भक गावकऱ्यांना आढळून आले. यानंतर गावाकऱ्यांनी याची माहिती परतूर पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या अर्भकाचे जालना येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गुप्त पद्धतीने या घटनेचा तपास केला असता गावातील एका घरात एका महिलेची प्रसूती झाल्याचे कळाले.
आईकडे येवून केली प्रसुती

पोलिसांना त्या घरात जाऊन तपासणी केली असता घनसावंगी तालुक्यातील एक महिला प्रसूतीसाठी आईकडे आली होती. सदर महिला अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली होती. तिची घरातच गुप्त पद्धतीने प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला नाल्यात फेकून देण्यात आले. शविच्छेदनानंतर सरपंचासह पोलिसांनी गावातील नागरिकांच्या उपस्थितीत अर्भकावर पोलिसांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. जन्म देणाऱ्या महिलेसह तिच्या आईविरुद्ध परतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default