झटपट श्रीमंत होण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला पाच दुचाकीसह अटक करण्यात धंतोली पोलिसांना यश आले. निलेश जनकपरिहार असे तरुणाचा नाव आहे
निलेश हा नागपूरात एका कंपनीत नोकरी करतो. झटपट श्रीमंत होण्याचा नादात दुचाकी चोरी करून विकत होता. एका दुचाकी चोरीच्या तक्रारीत शोध घेतला असतांना सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याला धंतोली पोलिसांनी ट्रॅप लावून अटक केली. या एका दुचाकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
चोरीच्या दुचाकींना मित्राच्या गाडीचा नंबर
चोरीच्या दुचाकींना मित्राच्या गाडीचा नंबर प्लेट लावून त्याच कागपत्रांची झेरॉक्स लावून विकत असल्याची मोडस पोलीस तपासात समोर आली. त्यांचाकडून शहरातील धंतोली, नंदनवन, बर्डी पोलिसांच्या हद्दीतील पाच दुचाकी मिळवण्यात यश आले आह