शिंगावे शिवारात दौलतनगर मागे एका कॉलनीत सौरभ बागुल याचे स्वतःच्या प्लॉटचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावर पाणी मारण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक मोटर सुरू करयला सौरभ गेला. यावेळी त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
विजेचा धक्का बसल्याने सौरभ दूरवर फेकला गेला. हे पाहून परिसरातील नागरीकांनी त्याला शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी सौरभला तपासणी करून मयत घोषित केले. सौरभच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार असून ऐन मातृदिनीच सौरभच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या आईची कोक सुनी झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
