संतोषकुमार रतनसिंग कामती (वय 33 वर्षे),आकाश श्रीपाल यादव (वय 23 वर्षे), अल्ताफ हुसेन अब्दुल मन्नान (वय 23 वर्षे), चंदासिंग राजेश राय (वय 40 वर्षे) आणि हेमलता गौरीशंकर राठोर (वय 36 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
या सर्व आरोपींविरोधात कलम 419,420,467,468,471,120 (b) भा.द. वि.सह कलम 66 (ड ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड मालवणी परिसरात राहणारे विजय पवार यांना एअरपोर्ट येथील ग्राउड स्टाफ करीता नोकरी देण्याचे आमिष दाखवले.
यासाठी त्यांच्याकडून रुपये 2,45,600 विविध बँक खात्यामध्ये मागवून घेतले. मात्र, विजय यांना कोणतीही नोकरी मिळाली नाही.यामुळे आर्थिक फसवणूक झाली म्हणून विजय पवार यांनी मालवणी पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार नोंदवली. यानुसार आरोपींविरोधात कलम 419,420,467,468,471,120 (b) भा.द. वि.सह कलम 66 (ड ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
गुन्ह्याचा तपास करताना मालवणी पोलिसांनी गुन्ह्यातील फसवणुक झालेली रक्कम वळवण्यात आलेल्या बँक खात्याची माहिती गोळा बँक खाते धारकास त्याचे राहते घरी फरीदाबाद, हरियाणा येथुन ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करुन दोन आरोपीना ताब्यात घेतले.
