बेदम मारहाण करीत वृध्दाचा खून ; दहा जणांवर गुन्हा

फुले शाहू आंबेडकर
0
साक्री तालुक्यातील म्हसाळे शिवारात बेदम मारहाण करीत रूदाणेतील वृद्धाचा खून करण्यात आला. त्यांनी पोलिसात  फिर्याद दिल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हा हल्ला झाला. याप्रकरणी 10 हल्ले खोरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नानाभाऊ बाबु भिल (वय 62 रा.रूदाणे ता. शिंदखेडा) असे मयत वृध्दाचे नाव आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिस ठाण्यात बापु काशीनाथ भिल याच्याविरूध्द फिर्याद दिली
या कारणावरून त्यांना दि. 7 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास म्हसाळे शिवारातील अमोदे फाट्याजवळ बापु काशीनाथ भिल याने कुर्‍हाडीने डोक्यात वार केला. तर नाना महादु भिल, सुकराम पुंडलिक भिल, राजु नाना भिल, सोनु भाया भिल, गणेश भाया भिल, बहिरम नाना भिल, दशरथ नारायण भिल, ज्ञानेश्‍वर पावबा भिल व जिभाऊ काशिराम भिल यांनी शिवीगाळ करीत लाठ्याकाठ्या आणि हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन नानाभाऊ यांचा मृत्यू झाला. याबाबत शानाभाऊ बाबु भिल याच्या फिर्यादीवरून मारहाण करणार्‍या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि गायकवाड करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default