शरीरसंबंध एकीसोबत अन् लग्न दुसरीसोबत, फसवणूक झाल्यावर तरुणीचं टोकाचं पाऊल

फुले शाहू आंबेडकर
0
एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत धक्कादायक प्रकार केला.
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. बलात्कार, खून, अनैतिक संबंधातून फसवणूक, आत्महत्या यासांरख्या घटना सातत्याने राज्यामध्ये घडत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटीत) नर्स युवतीला एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तसेच तिला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. मात्र, या तरुणाने संबंधित प्रेयसीला सोडून देत दुसरीसोबतच विवाह केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले. प्रियकराकडून फसवणूक सहन न झाल्याने या तरुणीने राहत्या घरातील टॉयलेटमध्ये विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default