चाळीसगावातील लॉजमध्ये तरुण-तरुणींचे गैरकृत्यशहरात संतापाची लाट, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा

फुले शाहू आंबेडकर
0
चाळीसगाव शहरातील रस्त्यावरील लॉज व हॉटेलांमध्ये  अवैधरीत्या देहविक्री व्यवसायासह तरुण-तरुणींची गैरकृत्ये सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. पोलिसांन लॉजचालकांना दरमहा आर्थिक भत्ता भेटत असल्यामुळे कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. लॉजेसमध्ये राजरोसपणे सुरू असलेली धिंगामस्ती कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुका मोठा असल्यामुळे चळीसगाव शहरात शिक्षणासह बाहेर गावाहुन कामानिमित्ताने येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर महाविद्यालयांसह शाळा असल्याने हजारो विद्यार्थ्यांचा नित्य वावर असतो. तसेच दररोज हजारो लोक याच रस्त्यावरुन ये-जा करीत असतात, या रस्त्यावरील लॉजमध्ये गैरकृत्ये सुरू असल्याचे चित्र असून त्याबाबत नागरिकांनी नाराजी व संताप व्यक्त करताना दिसून येत आहे. बस स्थानक, सिग्नल पॉंईट, वीर सावकर चौक, दुध डेअरी परिसरातील लॉज मध्ये संकाळी सातपासून मध्यरात्रीपर्यंत तरुण-तरुणींचा वावर दिसतो. सध्या शाळा, कॉलेज व महाविद्यालय बंद आहेत. परंतू इतरवेळेस महाविद्यालयांसह शाळकरी विद्यार्थीही लॉजेसबाहेर दिसतात. या ठिकाणी अवघ्या काही रुपयांत रूमम उपलब्ध करून देत गैरकृत्यांना मार्ग मोकळा करून दिला जातो. यात विशेष म्हणजे अल्पवयीन मुला-मुलीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. इतर तालुक्यातून देखील प्रेमीयुगल देखील येथील लॉजसमध्ये येवून मज्जा करीत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे रुमसाठी आधारकार्ड पुरावा म्हणून दिला जातो. चाळीसगाव शहरातील जवळपास सर्वच लॉजवर गैरकृत्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. काही ठिकाणी तर अवैधरीत्या देहविक्री व्यवसायासाठी बाहेरगावाहुन तरुणीना आनले जात असल्याची देखील चर्चा शहरात आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या कानापर्यंत ही खबर असून देखील आतापर्यंत ठोस करवाई केली जात नाही, कारण यामागे दरमाह मोठे आर्थिक कारण दडले असल्याची चर्चा आहेत. आतापर्यंत पोलिसांनी संबंधितांवर कारवाईची तयारी का दर्शविली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे
 प्रकरणाने शहर आणि तालुक्यातील पालकांमध्ये चिंता पसरली असून चाळीसगावचे नाव देखील बदनाम होत आहे. सद्या शाळा कॉलेज बंद असल्यामुळे हा प्रकार काहीसा बंद आहे. परंतू इतरवेळेस संकाळी शाळा, कॉलेजच्या नावाने बाहेर पडलेली तरुण-तरुणी लॉजवर गैरकृत्य करीत असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींना गैरकृत्य करण्यासाठी लॉजवर प्रवृत्त केले जात असल्याची देखील चर्चा आहे. पालकांसह पोलिस प्रशासनाने देखील कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळा, कॉलेजच्या वेळेत मुले जर बाहेर जात असतील तर तसेच शैक्षणिक संस्थांचीही याप्रकरणी जबाबदारी वाढली आहे.

पोलिसांनी वेळीच कठोर भूमीका घ्यावी

चाळीसगाव शहराला एक उज्वल परंपरा आहे. परंतू सद्या शहारातील लॉज व कॉम्प्लेक्स मध्ये तरुण-तरुणीचे गैरकृत्याचे प्रकार वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळेे पोलिसांनी वेळीच कठोर भूमीक घेवून आशा प्रकाराना आळा घालण्याची गरज आहे, नाहीतर भविष्यात याचे वाईट परिणाम शहराला भोगावे लागतील.

तुषार निकम, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

लॉज चालकाना तंबी देण्याची गरज

लॉज व हॉटेलवर अचानक धाड टाकूण पोलिसांनी होणारे गैरप्रकार टाळले पाहिजेत. तसेच लॉज चालकाना देखील तंबी देण्याची गरज आहे. यामुळे गैरकृत्य करणार्‍या तरुण-तरुणीनीमध्ये पोलिसांचा वचक निर्माण होईल. आणि होणार्‍या घटना टळतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default