यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कमदी.एन.डी.अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल नवापूर येथील वरिष्ठ लिपिक विनोद साकरलाल पंचोली याने दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा झाली होती. सदर रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात विनोद पंचोली याने तक्रारदाराकडून 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून काल दि. 21 जून 2023 रोजी पंच, साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
45 हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिकाला अटक
शुक्रवार, जून २३, २०२३
0
स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मिळणार्या रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात 45 हजाराची लाच स्वीकारणार्या नवापूर येथील एका शाळेच्या वरिष्ठ लिपिकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
