त्याप्रमाणे विहीर मंजूर झाली. सदर विहिरीचे खोदकाम व बांधकाम सुरु केल्यानंतर वेळोवेळी झालेल्या कामाची पंचायत समिती कृषी विभागाकडून पहाणी होवून पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली. त्यानंतर विहिरीचे उर्वरीत राहिलेले काम पूर्ण करुन त्या झालेल्या कामाचे अनुदान बिलाबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे गेले असता तुझ्या आईच्या नावावर असलेल्या विहिरीच्या दुसर्या हप्त्याचे बिलाचे काम केले आहे. एक लाख 31 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्या मोबदल्यात महा दहा हजार रुपये द्यावे लागतील असे पाटील यांनी सांगितले. लाचेची मागणी केल्यामुळे तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीरीची पडताळणी केल्यानंतर आज दि.22 जून रोजी विस्तार अधिकारी पाटील यांना शिरपूर शहरातील हॉटेल ग्यानमाई येथे तक्रारदाराकडून आठ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, राहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
