75 वर्षीय वृध्दाने सात वर्षीय बालकावर केला अनैसर्गिक अत्याचार

फुले शाहू आंबेडकर
0
शहरातील देवपूर भागात असलेल्या कालिका नगरात एका 75 वर्षीय वृध्दाने सात वर्षीय बालकावर निर्मनुष्य परिसरात अनैसर्गिक अत्याचार केला. याची वाच्चता करू नये म्हणून बालकाला धमकीही दिली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत कालिका नगरात राहणार्‍या पीडित बालकाच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सात वर्ष नऊ महिने वयाच्या बालकाला परिसरातील बापू चव्हाण (वय 75) याने कालिका नगराजवळील निर्मनुष्य परिसरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच त्याची कोठेही वाच्चता करू नये म्हणून बालकाला धमकीही दिली. याप्रकरणी वृध्दावर भादंवि 377 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण सन 2012 चे अधिनियम कलम 4, 6, 8 12 सह अजाजअ प्रति. अधि. कलम 3 (1), (10), (2), (5), (5 अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषीकेश रेड्डी हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default