नवरी वाट बघत होती मात्र नवरदेवाने मिरवणूक आणण्यास दिला नकार, नेमकं प्रकरण काय?

फुले शाहू आंबेडकर
0
सध्या लग्न समांरंभाचा सीझन सुरु असून सर्वत्र लग्नाची धुमाकूळ पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी लग्न होत असून यादरम्यानच्या अनेक घटना चर्चेत येत आहेत.
सध्या लग्न समांरंभाचा सीझन सुरु असून सर्वत्र लग्नाची धुमाकूळ पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी लग्न होत असून यादरम्यानच्या अनेक घटना चर्चेत येत आहेत. लग्नामधील मजा मस्तीचे व्हिडीओ तर समोर येतच असतात मात्र अनेकवेळा लग्नातील काही धक्कादायक, विचित्र घटनाही समोर येतात. नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये हुंड्यात बुलेट न दिल्यामुळे नवरदेवाने मिरवणुक आणण्यास नकार दिला. या घटनेनं एकच खळबळ उडाली.

तरुणी आपल्या नवदेवाची आतुरतेने वाट पाहत होती तर तिचे कुटुंबीय मिरवणुकीच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त होते. मात्र हुंड्यामध्ये बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाने मिरवणूक आणण्यास नकार दिला. यामुळे नवरीच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली. ही घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील बंजारिया गावातील एका व्यक्तीने आपली मुलीगी नियामत अली लग्न शेजारच्या गावातील इस्माईलसोबत ठरवलं होतं. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 20 जून रोजी विवाह होणार होता. पलंग, कपाट, सोफा सेट व इतर वस्तू हुंडामध्ये दिल्या. मात्र एका बुलेटवरुन त्यांनी आपली मिरवणूक आणण्यास नकार दिला. यामुळे मुलीकडच्या लोकांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, लाखो विनंती करूनही मुलाच्या बाजूचे लोक मिरवणुकीत न आल्याने मुलीकडील लोकांनी पोलीस ठाण्यात मुलाच्या बाजूने तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलीकडील कुटुंबाची परिस्थिती हालाकिची असल्याने त्यांनी बुलेट द्यायला असर्थता दर्शवली आणि मुलाने मिरवणुक आणण्यास नकार दिला. हे प्रकरण सध्या चर्चेत आलं असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default