कंपासमधील कटरने गळ्यावर वार करत डोक्यात घातला दगड; राहुल हंडोरेने दिली कबुली

फुले शाहू आंबेडकर
0
लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात दर्शनावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चारवेळा वार केले. कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल हंडोरे याने सोमवारी पोलिसांना दिली.
मात्र, हे सगळे माझ्या हातून अनवधानाने घडले, असेही राहुलने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.एमपीएससीच्या परीक्षेसाठी आम्ही दोघे एकत्र अभ्यास करत होतो. यादरम्यान मी तिला प्रपोजही केले होते. एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी तिला मदत केली. एमपीएससी परीक्षा पास झाल्यावर दर्शनाने लग्नाला नकार दिला. याचाच राग आल्याने मी तिला संपवायचे ठरविल्याचे राहुल याने चौकशीदरम्यान सांगितले. या घटनेच्या सीसीटीव्हीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दर्शना ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाली होती. तिचा खून झाल्यामुळे खळबळ उडाली होती. घटनास्थळी मोबाईल, बूट ,गॉगल, पर्स, ओढणी या वस्तूंवरून दर्शनाच्या मृतदेहाची ओळख पटली.
शवविच्छेदन अहवालात डोक्यावर आणि अंगावरील मारहाणीच्या जखमांमुळे दर्शनाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. १८ जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती मित्र राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला २१ जून रोजी रात्री उशिरा त्याला मुंबईत अटक करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default