अल्पवयीन मुलीचे आधी अपहरण, मग अत्याचार; पुढे जे घडले ते याही पेक्षा भयंकर, काय आहे प्रकरण?

फुले शाहू आंबेडकर
0
मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना सध्या सांगली जिल्ह्यात उघडकीस आली असून, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सांगलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कायदे कितीही कडक झाले तरी मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. सांगलीतील मिरजमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मिरजमध्ये घडली. नराधम एवढ्यावरच थांबला नाही. अत्याचार केल्यानंतर मुलीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरोधात मिरज शहर पोलिसात अपहरण पोक्सो ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद मोतुगडे माळी असे आरोपीचे नाव आहे.
रिक्षातून अपहरण करत अत्याचार
सदरच्या पीडित मुलीचे रिक्षातून अपहरण करत तिला मिरजेतील एका निर्जन ठिकाणी आणले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिच्या गळ्यावर वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, पीडित मुलीला नातेवाईकांनी उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. शहर पोलिसात नराधम प्रसाद मोतुगडे माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ब्राह्मणपुरी मिरज येथील रहिवासी आहे. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default