नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील दारणा नदी परिसरातील भैरवनाथ मंदिराजवळ एका २९ वर्षाच्या युवकाने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून इंजिनीयर असलेल्या युवकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येसाठी वापरलेला गावठी कट्टा कुठून मिळाला? याचा शोध पोलीस घेत आहेत.
नळवाडी सिन्नर येथील संदीप नाना सहाने (30) हा युवक एम.आय.डी.सी माळेगाव येथील कंपनीत मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून काम करीत होता. एक वर्षापूर्वी विवाह झाल्याने सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या पत्नीसोबत चेहडी पंपिंग, मराठा नगरमधील लंबोधर हाईल्स येथे राहत होता. संदीप याचे नातेवाईक असलेल्या एका मुलीवर प्रेम होते. मात्र दोघांचाही वेगवेगळ्या ठिकाणी विवाह झाल्याने संदीप हा नैराश्यात होता. मंगळवारी तो प्रेम असलेल्या मुलीला भेटण्यासाठी गेला असता भेट न होताच तो माघारी आला
दरम्यान बुधवारी सकाळी दर्शनाला जातो, असे पत्नीला सांगून दुचाकी घेऊन गेला. त्याला घरी येण्यास उशीर झाल्यामुळे पत्नीने त्याच्या मामेभाऊ समाधान पगार याला फोनवर माहिती दिली. पगार हा घटनास्थळी गेला असता, संदीप कपाळावर गावठी कट्ट्याने गोळी झाडून रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर
पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
