चांदसैली घाटात अपघात; चालकाच्‍या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना, ७ प्रवाशी जखमी

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात आज प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनाचा अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्‍याने  अपघात झाल्‍याचे सांगितले जात आहे. यात सात जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही
नंदुरबार जिल्‍ह्यातील चांदसैली घाटावर धोक्‍याचे वळण आहेत. याच घाटात प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहन धडगाववरून तळोद्याकडे येत होते. या दरम्‍यान घाटातील वळण रस्त्याजवळ वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट घाटातील दगडावर धडकले. यात प्रवास करत असलेले सात प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करुन सोडून देण्यात आले.
मोठी दुर्घटना टळली

सुदैवाने बाजुला दरी असतांना वाहन चालकाने प्रसंगावधानता दाखवत विरुद्ध दिशेला वाहनाला वळवत मोठ्या दगडाला धडक मारली. अन्‍यथा वाहन खोल दरीत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. यात मोठी जीवितहानी होण्याची देखील शक्‍यता होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default