उत्तर प्रदेशातील झाशीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मुलाच्या महिलेचं तिच्या नवऱ्याचा लहान भावाशी विवाह बाह्य संबंध होते. बायकोच्या या कृत्याबद्दल नवऱ्याला कळल्यावर त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. ज्यावेळी नवऱ्याने पत्नीला रंगहात पकडलं त्यानंतर त्या दोघांमध्ये वारंवार भांडण होत होती. भविष्यात आपण असं काही करणार नाही, असा शब्द पत्नीने पतीला दिला होता. तिने पतीची वारंवार माफी मागितली होती.
पण एकदा विश्वासघात झाल्यानंतर पूर्ण विश्वास ठेवायला वेळ लागतो. नवरासारखा त्याच विषयावरुन तिच्याशी रोज वाद घालत होतो. बुधवारी रात्री त्यांमध्येल भांडण टोकाला गेलं. या भांडण्यावेळी पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर पती फरार झाला. महिलेच्या नातेवाइकांनी पतीबद्दल पोलिसात तक्रार केली. अखेर शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याचा लहान भावालाही ताब्यात घेतलं आहे. त्या दोघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. मृत महिलेचं लग्न 12 वर्षांपूर्वी न्यू प्रेमगंजमधील सचिन मोटे या व्यक्तीशी झालं होतं
त्यांना तीन मुलं झाली पण यादरम्यान तिचं नवऱ्याच्या लहान भावावर जीव जडला. लव्ह अफेयरच्या वेळी त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या अफेयरची कल्पना नवऱ्याला लागली. त्यानंतर दोघांमध्ये रोज भांडण व्हायला लागली. घटनेच्या 15 दिवसांपूर्वीच महिला भांडणाला कंटाळ तिच्या माहेरी गेली होती. पतीने घटनेच्या दिवशी तिला फोन करुन बोलवून घेतले होते. त्याने पत्नीला मारण्याचा कट रचला होता, पोलीस सूत्रांची माहिती आहे.
