बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुला आणि मुलीची मैत्री झाली. मुलीचे वय अवघे 13 असून मुलांचेही त्यापेक्षा दोन वर्ष जास्त आहे. 26 जून रोजी गावातीलच एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर इतर दोन मित्रांच्या मदतीने ते नगरपर्यंत गेले. तेथून दोन मित्र परत आले तर पीडिता व मुलगा हे पुण्याला गेले. पुण्यातील एका नातेवाइकांकडे त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. काही तास राहिल्यानंतर नातेवाइकांना यांच्याबद्दल संशय आला. त्यांनी गावाकडे विचारणा केल्यावर हे पळून आल्याचे समजले.
नातेवाईकांची सजगता
तेथील नातेवाइकांनीही सजगता दाखवत त्यांना भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाइकांना पुण्याला बोलावून घेत दोन्ही अल्पवयीन मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. परंतु परत आल्यावर पीडितेने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर चकलांबा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अत्याचार करणाऱ्यासह पळवून जाण्यास मदत करणाऱ्या दोन मित्रांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला
