ड्रामेबाज वाहनचालकावर 'उत्पादन शुल्क विभाग' भारी; मद्यसाठा चोरीला गेल्याचा बनाव केल्याचे उघडकीस

फुले शाहू आंबेडकर
0
मद्याच्या कंपनीतून वाहनचालकाने मद्यसाठ्याची परस्पर विक्री करत वाहन पुढे जाताना अपघात होऊन मद्यसाठयाची तुटफुट झाल्याचा बनाव रचुन व त्यातील मद्यसाठा चोरीला गेल्याचे भासवुन सबंधित पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद देऊन मोटार विमा कंपनीकडुन आर्थिक मोबदला घेण्याचा बनाव रचणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  पथकाने कारवाई करत तब्बल ३२ लाख १८ हजार ७२० रुपयांचा चोरी गेलेला मद्यसाठा जप्त केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,(दि.८जून) मे परनॉड रिकार्ड इंडिया प्रा. ली. कादवा म्हाळुंगी ता. दिडोरी जि. नाशिक यांच्याकडून अजंता ट्रान्सपोर्ट कंपनीने त्यांच्या वाहनात (एम एच १५ ए एफ ५८६०) विदेशी मद्याच्या ४६ हजार ८० बाटल्या असे ९६० बॉक्स नांदेड येथिल मे.अलका वाईन्सला पोहचविण्यासाठी जात असताना सदरहू ट्रक हा जिंतुर-परभणी रोड, पांगरी शिवार या ठिकाणी अपघातग्रस्त झाला होता.
यावेळी सदरहू ट्रकमधील मद्यसाठा मोजला असता त्यामध्ये तफावत मिळुन आल्याने दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, परभणी यांनी त्याबाबत जिंतुर पोलीस ठाण्यात मद्यसाठा चोरीबाबत गुन्हा नोंदविला. याबाबत अधिक्षक शशिकांत गर्जे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरहू अपघातग्रस्त ट्रक चालकाने अपघात होण्याअगोदरच सदर मद्यसाठा परस्पर विक्री केला असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदरहू गाडीबाबत मार्गस्थ झाल्यानंतर पुढे कोणत्या ठिकाणी गेली व मद्यसाठा कोठे असू शकतो या बाबत व्हेकल ट्रॅकींग सिस्टीम या यंत्रणेच्या साह्याने माहीती मिळवत नाशिक जिल्ह्यात ०४ पथके तयार करुन सदरहू गुन्ह्याबाबत तपास करण्यास सांगीतले.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८जून राज्य उत्पादन शुल्क ब विभाग निरीक्षक सुनिल देशमुख यांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्ग, व्हीटीसी फाटा, वाडीवऱ्हे ता. ईगतपुरी जि. नाशिक येथे (एमएच १५ ईजी ६६८०) या पिकअप मध्ये १०० बॉक्स व २ संशयित ताब्यात घेतले.तसेच निरीक्षक साबळे यांच्या पथकाने हॉटेल सारेगामा, खंबाळे शिवार व धामणी शिवार ता. ईगतपुरी या दोन्ही ठिकाणवरुन दोन संशयित व ५४ बॉक्स हस्तगत केले तसेच निरीक्षक ब विभाग यांचे सोबत निरीक्षक अ विभाग योगेश सावखेडकर व विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग निरीक्षक अरुण चव्हाण यांचे पथकाने वडनेर दुमाला शिवार ता. जि. नाशिक या ठिकाणवरुन २०० बॉक्स हस्तगत केले.

या कारवाईत ०६ संशयित संदिप भास्कर गायकर, राजेंद्र भागवत पवार, धनंजय निवृत्ती भोसले, रोहित देविदास शिंदे, अजीज फैजुल्ला शेख, अजीत ओमप्रकाश वर्मा यांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्या ताब्यातून विदेशी मद्याच्या १ लाख ६९ हजार ९९२ बाटल्या असे ३५४ बॉक्स एक (एम एच १५इ जी ६६८०) बोलेरो पिकअप असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक सुनिल देशमुख, अरुण चव्हाण, जी. पी. साबळे, योगेश सावखेडकर, जयराम जाखिरे तसेच दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकुर, राहुल केदार, धिरज जाधव, भावना भिरड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मनोहर गरुड, विष्णु सानप, मायकल पंडीत, जवान अमित गांगुर्डे, महेश सातपुते, रॉकेश पगारे, संतोष कडलग, बिजेंद्र चव्हाण, संतोष बोऱ्हाडे, सुनिल दिघोळे, सुनिता महाजन,वाहनचालक महेंद्र बोरसे, विरेंद्र वाघ, रॉकेश पगारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. याप्रकरणी पुढील तपास निरीक्षक सुनिल देशमुख करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default