लग्नाच्या नाचगाण्यावेळी केलेल्या गोळीबारात तरुण जखमी

फुले शाहू आंबेडकर
0
लग्नानिमित्त सुरु असणाऱ्या नाचगाण्यावेळी हवेत केलेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील देसाई वस्तीवर घडली.
लग्नानिमित्त सुरु असणाऱ्या नाचगाण्यावेळी हवेत केलेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील देसाई वस्तीवर घडली. जखमी तरुणावर कोल्हापुरातील सीपीआर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत
अवधूत देसाई यांच्या लग्नानिमित्त रात्री नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ॠषी इंगळे, अजय इंगळे, सनी गायकवाड हे देसाई वस्तीवर गेले होते. यावेळी ओंकार देसाई याने रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यातील गोळी ॠषी देसाई यांच्या डाव्या दंडात घुसली. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी ओंकार देसाई व संजय देसाई फौजी या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदरचे रिव्हॉल्व्हर देसाई फौजीचे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default