नंदुरबार लोकसभा मतदार संघातील ७७७ गावांसाठी १५५ कोटींचा निधी मंजूरप्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत होणार विविध विकास कामे

फुले शाहू आंबेडकर
0
खा.डॉ.हीना गावीत व आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत १५५ कोटी २५ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत असलेल्या ७७७ गावांमध्ये विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावीत व आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नाने नंदुरबार लोकसभा मतदार संघातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी व नवापूर तालुक्यातील गावांना प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना सन २०२१-२२ व २०२२- २३ या आर्थिक ग्राम विकास आराखड्यांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.

सदर योजने अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील ८९ गावे, शहादा तालुक्यातील १११ गावे, नवापूर तालुक्यातील १४५ गावे, तळोदा तालुक्यातील ७२ गावे, अक्कलकुवा तालुक्यतील १४२ गावे, अक्राणी तालुक्यातील ११९ गावे अशी एकुण ६७८ गावे व धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ६० गावे साक्री तालुक्यातील ३९ गावे अशा एकुण ७७७ गावांना सदर योजनेमधुन नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत १५५ कोटी २५ लाख ६७ हजार रुपये एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे.

या निधीव्दारे या गावांमध्ये गाव अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, बंदिस्त गटार, बसस्टँड, अंगणवाड्या, महिला व पुरुष शौचालय, सार्वजनिक मुतारी, पाण्याची टाकी बांधणे व नळ जोडणी करणे, जिल्हा परिषद वर्गखोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह रस्ते व पुलांचे बांधकाम, स्मशानभुमी बांधकाम, आरोग्य उपकेंद्र बांधकाम, संरक्षण भिंत, ग्रंथालय, व्यायामशाळा, आर.ओ. वॉटर फिल्टर, सोलर ड्युअल पंप, सोलर लाईट, हँडपंप, अशा विविध विकासकामांना चालना मिळणार आहे.,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default