कॉफी शॉपच्या आतमध्ये ६ बेडरूम, पोलिसांनी धाड टाकताच कॉलेजचे विद्यार्थी नको त्या स्थितीत दिसले

फुले शाहू आंबेडकर
0
कोचिंग क्लासेसजवळ कॉफी शॉप, कॉफी शॉपच्या आत सहा खोल्या, खोल्यांमध्ये विद्यार्थी, जालन्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
जालना: कॉफी शॉपमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा सदरबाजार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील आझाद मैदान परिसरातील कोचिंग क्लास संकुलाच्या शेजारच्या ‘कॉफी थिंकिंग कप शॉप’मध्ये राजरोसपणे हा धक्कादायक प्रकार सुरू होता.
नगर परिषदेच्या आझाद मैदान बाजार संकुलनातील बाहेरून दिसणाऱ्या कॉफी शॉपमध्ये आतील भागात सहा बेडरूम कम्पार्टमेंट करून, तेथे सेक्स रॅकेट सुरू होते. या बाजार संकुलात पाच मोठे कोचिंग क्लास चालतात. तेथे महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येत येथे येत असतात. पोलिसांनी शनिवारी दुपारी या कॉफी शॉपमध्ये छापा घातला. त्या वेळी तेथे अकरावी, बारावीत शिकणाऱ्या कोचिंग क्लासच्या पाच विद्यार्थिनी आणि त्यांचे महाविद्यालयीन मित्र आक्षेपार्ह स्थितीत आढलले. या प्रकरणी आकाश नारायण मोरे (वय २७, रा घाडेगाव, ता. जि. जालना), आशिष विष्णू आंबेडकर (वय २३, रा. भेलपुरी खु., ता. जि. जालना) यांना पोलिसांनी अटक केली.
कॉफी शॉपमधील या कम्पार्टमेंटचे अर्ध्या तासाचे भाडे पाचशे रुपये घेतले जात होते. अशा सहा कम्पार्टमेंटमधून हा धंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या सर्व प्रकारची खात्री करण्यासाठी बोगस ग्राहक पाठवला होता. कॉफी शॉपमध्ये बेड मिळण्यास पाउण तास प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक दीपाली शिंदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रेगे, हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, भरत ढाकणे, प्रदीप करतारे यांनी या वेळी छापा घातला
कॉफी शॉपमध्ये येणाऱ्या तरुण जोडप्यांची कोणतीही माहिती किंवा नोंद रजिस्टरमध्ये आढळली नाही. संबंधित जागेत कॅफे चालविण्याची; तसेच आतील भागात केलेल्या बदलांची परवानगी घेतली नव्हती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default