केंद्रीय मंत्र्यांच्या आईला भररस्त्यात लुटलं, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक शहरातील आरटीओ रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंना भररस्त्यात लुटलं आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या आईला अशाप्रकारे भररस्त्यात लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
टीव्ही ९ मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदी करण्यासाठी घरापासून काही अंतरावर गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली आहे. ऐवज हिसकावल्यानंतर आरोपींनी त्वरित घटनास्थळावरून पळ काढला.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिक शहरातील म्हसरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे. आरोपींची अद्याप ओळख पटली नसून घटनेचा तपास सुरू आहे.

मागील काही दिवसात नाशिक शहरात चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, शनिवारी सायंकाळी साखळी चोरांनी थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईलाच लक्ष्य केलं आहे. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default