तपासणीत 28 जणांविरुद्ध 18 गुन्हे; ढाबे, हॉटेल्सवर कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे आठ डिसेंबरपासून जिल्ह्यातील मुंबई- आग्रा तसेच सुरत-नागपूर महामार्गांवरील ढाब्यांसह हॉटेल्सची अचानक तपासणी झाली. यात १८ ढाबे व हॉटेल्समध्ये गैरप्रकार आढळले.

याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात २८ संशयितांवर १८ गुन्हे दाखल झाले
जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, गैरप्रकारांना आळा बसविण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कडक सूचना करण्यात आल्या आहे. या पार्श्वभूमीवर आठ डिसेंबरपासून स्थानिक पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्गांवरील हॉटेल व ढाब्यांची तपासणी झाली.

त्यानुसार आझादनगर पोलिस ठाण्याच्या अखत्यारित एक ढाबा, चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील तीन, पश्चिम देवपूर पोलिस ठाणे हद्दीत चार ढाब्यांची तपासणी झाली. यात कुठेही अनुचित प्रकार आढळले नाहीत.

मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन हॉटेलची तपासणी झाली. त्यात एका रेस्टॉरंटमध्ये अवैध दारु आढळली. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले. धुळे तालुका पोलिस ठाणे हद्दीत सहा ठिकाणी तपासणी झाली.
त्यात अवैध दारुसंबंधी सात गुन्हे दाखल झाले. शिरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी अवैध मद्य आढळले. याबाबत दोन संशयितांवर गुन्हा नोंद झाला. साक्री पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक ठिकाणी कारवाई केली.

सोनगीर (ता. धुळे) पोलिस ठाणे हद्दीत पाच ढाब्यांची तपासणी झाली. यात एका ठिकाणी दारूबंदीची कारवाई केली. दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाणे हद्दीत चार हॉटेलची तपासणी झाली. मात्र, कुठेही गैरप्रकार आढळला नाही. थाळनेर (ता. शिरपूर) पोलिस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी तपासणी झाली.

निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाणे हद्दीत चार ठिकाणी तपासणी झाली. पिंपळनेर (ता. साक्री) पोलिस ठाण्याच्या अखत्यारित चार ठिकाणी तपासणी झाली. अवैध दारूबाबत बारा जणांविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default