खोट्या सह्या, अंगठे घेत बँक कर्मचाऱ्याकडून खातेदारांची फसवणूक

फुले शाहू आंबेडकर
0
बॅंकेतील खातेदारांच्या नावे बनावट सह्या करून बॅंक कर्मचाऱ्यानेच बॅंकेतून सात लाखाचा अपहार करून फसवणूक केल्याचा प्रकार धडगाव येथील भारतीय स्टेट बॅंकेचा शाखेत घडली.

याबाबत संशयितांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला
धडगाव (जि.नंदूरबार) येथील भारतीय स्टेट बॅंकेची शाखा आहे. या बॅंकेतच नोकरी करणारे भिमसिंग वन्या राहसे यांनी बॅकेतील पदाचा दुरुपयोग करीत बॅंक ग्राहकांचा खात्यातून त्यांच्या बनावट सह्या आणि अंगठे घेत खात्यातून पैसे काढून अपहार केले.

२० जानेवारी २०१८ ते १७ आक्टोबर २०२० या कालावधीत श्री. राहासे यांनी एकूण सहा लाख ९५ हजार ९०० रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. काही सूज्ञ ग्राहकांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी खात्यातून आपण पैसे काढलेच नाहीत तर ते काढल्याचे दिसते कसे आहे? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना उपस्थित केला.
त्यामुळे बॅंकेची शाखाधिकारी भूषण जयंत अत्रे यांनी चौकशी केली असता त्यात बॅंकेचे कर्मचारी असलेले भिमसिंग राहसे यांनी बनावट सह्या करून पैसे काढून अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातून बॅंकेचा ग्राहकांची व बॅंकेची फसवणूक केली.

याप्रकरणी शाखाधिकारी श्री.अत्रे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भिमसिंग राहसे याच्याविरूद्ध फसवणुकीचा व अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default