कारमध्ये बसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धुळ्यातील घटना

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : लहान मुलांच्या निरागस स्वभावाचा गैरफायदा घेत एकाने अल्पवयीन मुलीला जवळ बोलावले आणि चारचाकी वाहनात बसून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना धुळ्यातील साक्री रोड भागात बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री पोक्सोसह विविध कलमान्वये एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्री रोडवरील एका भागात एक परिवार वास्तव्यास आहे. ते राहात असलेल्या भागात त्यांच्या परिचितांचे घर आहे. त्यांच्याकडे परिवाराचे येणे-जाणे आहे. काहीवेळेस मुले त्यांच्याकडे राहतातसुद्धा. सर्व काही सुरळीत सुरू असताना एक अल्पवयीन मुलगी त्यांच्याकडे राहायला होती. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा एकाने उचलला. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्या मुलीला घेऊन संशयिताने त्याच्या दारापुढे लावलेल्या कारमध्ये तिला बसवले. त्यानंतर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. तिने आरडाओरड करू नये म्हणून त्याने कारच्या काचादेखील बंद ठेवल्या होत्या.
सकाळी ही मुलगी आपल्या घरी परतल्यानंतर घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. त्यामुळे मुलीला आणि स्वत:ला सावरून पीडित मुलीच्या आईने थेट शहर पोलिस ठाणे गाठत आपबीती कथन केली. त्यानुसार गुरूवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच भागात राहणाऱ्या संशयित व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३७६ (३) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ८ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. आर. शेख करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default