ठाणे जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा संघटकपदी पत्रकार विकास जगताप यांची नियुक्ती.

फुले शाहू आंबेडकर
0
ठाणे प्रतिनिधी.:- व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा संघटकपदी दैनिक साम्राज्य तसेच क्राईम सूत्रचे कार्यकारी संपादक विकास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या हस्ते उल्हानगरमधील येथे संघटनेच्या कार्यालयात देण्यात आले.यावेळी ठाणे जिल्हाचे कार्यकारी अध्यक्ष जाफर वणू, महासचिव रामेश्वर गवई, पत्रकार निलेश घाग सह अनेक पत्रकार उपस्थित होते. नियुक्तीनंतर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.विकास जगताप यांच्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपली पत्रकारितेमधील उज्ज्वल कारकीर्द, काम पाहून आपली व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या ठाणे जिल्हा संघटकपदि आम्ही नियुक्ती करत आहोत. ही नियुक्ती करत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की, आपण खूप गतीने काम कराल. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारित असे पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठीच आपण काम करणार आहोत. आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल, ही अपेक्षा आहे. तसेच आपण आपल्या कार्यक्षेत्रात असणार्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी पदाधिकारी नियुक्त करावे. आपण पुढील कामास गती द्यावी, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.विकास जगतप यांच्या नियुक्तीनंतर बोलताना जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे म्हणाले, विकास जगताप हे एक सामाजिक शैक्षणिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात.तसेच त्यांनी पत्रकारिता करत असताना अनेक सामाजिक प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत. तसेच अनेक संस्था संघटना यांनी त्यांना अनेक अनमोल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ग्राउंडलेव्हलला काम करून ते पुढे आलेले पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांना तळागाळातील पत्रकारांच्या समस्यांची पूर्ण जाण आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ते निश्चितपणे हे प्रश्न मार्गी लावतील. संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल असे सांगितले.तसेच पत्रकार विकास जगताप यांच्या नियुक्तीने संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default