दिनांक 7 डिसेंबर गुरुवार रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा बैठक ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनुपजी गवळी तसेच प्रदेश सहसचिव योगेश जी हजारे खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष माननीय श्री किशोर आप्पाजी भोसले तर खामगाव पोलीस क्लब चे सल्लागार मार्गदर्शन जगदीश जी अग्रवाल यांच्यासहसंपन्न झाली असून या बैठकीत दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन जळगाव जामोद या ठिकाणी होत असून त्या अधिवेशना च्या अनेक विषयांसह आयोजन नियोजन संदर्भात ही बैठक संपन्न झाली याच बैठकीदरम्यान अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका संघटक आधारवड वृत्तपत्राचे संपादक शेख सलीम यांनी साप्ताहिक आधारवड वृत्तपत्राच्या उपसंपादक पदी राशीत खान यांची नियुक्ती केली तर राशीद खान यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनुपजी गवळी यांनी जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती केली आहे या बैठकीतच राशीद खान यांचा सत्कार करून यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते
3/related/default
