जिल्ह्यात 12 जणांवर गुन्हा; पोलिसांतर्फे MIDC मधील बंद कंपन्या, गुदामांची झडती

फुले शाहू आंबेडकर
0
पोलिस उपअधीक्षक आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने धुळ्यासह नरडाणा, बाभळे (ता. शिंदखेडा) परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील बंद कंपन्या, गुदामांची तपासणी केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार पोलिस उपअधीक्षक आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने धुळ्यासह नरडाणा, बाभळे (ता. शिंदखेडा) परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील बंद कंपन्या, गुदामांची तपासणी केली.

तसेच एमआयडीसी परिसरातील चहा टपऱ्या, हॉटेल, खानावळ आदींची झडती घेतली. शाळा व महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई केली. यात संबंधितांवर एकूण १२ गुन्हे दाखल केले.
जिल्ह्यातील एमआयडीसीमधील बंद कंपन्या, गुदामांची अनपेक्षित तपासणी करीत काही संशयास्पद आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक धिवरे यांनी पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, सचिन हिरे यांना दिले.

त्यानुसार त्यांनी त्यांच्या विभागातील पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार, आरसीपी पथक, दामिनी पथकासमवेत शहराजवळील अवधान तसेच नरडाणा, बाभळे (ता. शिंदखेडा) एमआयडीसीतील बंद कंपन्या, गुदामांची तपासणी केली. तपासणीत संशयास्पद काहीही आढळले नाही.

मात्र, एमआयडीसी परिसरातील हॉटेल, चहाची दुकाने, खानावळ टपऱ्यांची तपासणी केली असता अवैध दारू सापडली. संबंधितांविरुद्ध नरडाणा आणि मोहाडी पोलिस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल केले.
शिवाय शाळा व महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई करून सात गुन्हे नोंदविले. पथकाने या कारवाईत पाच हजार ५६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default