ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली आपासो शेळके, अक्षय संजय निगडे, वैभव संजय निगडे, ओंकार राजेंद्र निगडे, आप्पासाहेब सदाशीव काळे, दिगंबर आप्पासो काळे (सर्व रा. कानगाव ता.दौंड जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामसभेचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश्वर उर्फ माउली आपासो शेळके ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मोहन मिसाळ यांना माझा अर्ज घ्या असे म्हणताच राजेंद्र गवळी यांनी अर्ज देण्यासाठी सात दिवसांची मुदत असते, ती मुदत संपून गेली आहे, तरी तुम्ही अर्ज स्विकारू नका असे ग्रामसेवक याना सांगितले.
या कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर ज्ञानेश्वर शेळके याने त्याचे मेहुणे वैभव संजय निगडे, अक्षय संजय निगडे व ओंकार राजेंद्र निगडे यांना जावा रे तलवारी घेऊन या, याला आज जिवंत सोडायचे नाही असे म्हणाल्याने वैभव संजय निगडे, अक्षय संजय निगडे हे दोघे हातात लोखंडी तलवार व ओंकार राजेंद्र निगडे हा त्याचे हातात लोखंडी कोयता घेवून धावत मदिरा शेजारी येवून या राजेंद्र गवळीला खल्लास करतो असे म्हणून अक्षय संजय निगडे याने मानेवर तलवारीने वार केला.
त्यावेळी वैभव शांताराम गवळी याने वाचवण्यासाठी हाताने तलवारीचा वार झेलला, त्यावेळी त्याचे डावे हाताचे, पंजाला गंभीर दुखापत झाली. वैभव गवळी याच्या पाठीतही वार झाल्याने गंभीर दुखापत झाली. जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला व ही भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. अशी फिर्याद राजेंद्र दशरथ गवळी यांनी यवत पोलीस ठाण्यात दिल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.
