देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला बाहेरगावी नेलं; २५० फूट खोल दरीत फेकलं, पुण्यातील भयानक घटना

फुले शाहू आंबेडकर
0
हत्येनंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव पतीने रचला. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तब्बल अडीज महिन्यांनी या खूनाचा छडा लावत आरोपी पतीला अटक केली.
ललिता अमोलसिंग जाधव (वय ३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय २६) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोलसिंग याने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नी बेपत्ता झाल्याची लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली होती. 

त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी आरोपी अमोलसिंग याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.
अमोलसिंगने कुटुंबीयांच्या दबाबामुळे वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला होता. दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर होते. त्याचे पत्नीशी वाद व्हायचे. वयाने मोठी असल्याने पत्नीला त्याने सोडचिठ्ठी देण्यास सांगितले होते. मात्र, ललिताने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्याने तो तिच्यावर चिडला होता.

त्यामुळे अमोलसिंगने पत्नीला संपवण्याचा कट रचला. ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोपीने पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीत परिसरात नेलं. तिथे गेल्यानंतर २५० फूट खोल दरीत फेकून तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव पतीने रचला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default