धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी धरती देवरे यांची बिनविरोध निवड

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या सदस्या धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे, माजी अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज जिल्हा परिषदेच्या  सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. 
धुळे जिल्हा परिषदेच्या  अध्यक्षस्थानी असलेल्या अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिला होता. यानंतर रिक्त असलेल्या पदावर धरती देवरे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी धरती देवरे यांचा (BJP) एकमेव अर्ज होता. यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती, त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली. 
धरती देवरे या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे यांच्या सुनबाई आहेत. तर गुजरातच्या नवसारी मतदार संघातील खासदार सी. आर. पाटील यांच्या त्या सुकन्या आहेत. खासदार सी. आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. धरती देवरे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
ताईसाहेब धरती देवरे यांची धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सुरत येथील खबरदार क्राईम न्यूज व फुले शाहू आंबेडकर वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात आले त्याप्रसंगी गुजरात राज्य उपसंपादक एम.एस.अहिरे, प्रविण भाई राजपूत , विनोद भाई पवार आदी मान्यवर उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default