म्हसावद पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे हवालदार बहादूर भिलाला, पोलिस नाईक दादाभाई साबळे
पोलिस शिपाई राकेश पावरा, सचिन तावडे यांनी सापळा रचून खेतिया शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे सार्वजनिक जागी काळ्या रंगाची ॲपे रिक्षा (एमएच १८, बीएच १४८४) आढळली.
रिक्षा तपासणी केली असता त्यात एक लाख ८९६ किमतीच्या एकूण पाच निळ्या रंगाच्या मोठ्या गोण्या, त्यात प्रत्येकी ५२ केसरयुक्त विमल पानमसाला गुटख्याचे पाउच असे एकूण २६० पाउच, पांढऱ्या रंगाच्या एकूण पाच गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये ५२ तंबाखूचे पाउच एकूण २६० पाउच.
तीन पांढऱ्या रंगाच्या गोण्या, त्यात ६० खोके, तीन लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची ॲपे रिक्षा असा एकूण चार लाख ८९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
