शिरपूर: प्रतिनिधी :( ओंकार ईशी) शिरपूर तालुक्यातील आरसी पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे इयत्ता बालवाडी ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार पडला या सांस्कृतिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सीईओ डॉ. उमेशजी शर्मा साहेब, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी लखन चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य बापू पारधी,ग्रामपंचायत खामखेडा सरपंच बारकू धनगर, माजी सरपंच टेकवाडे संजय धनगर, माजी उपसरपंच सदाशिव वाडीले वि.का.सोसायटी टेकवाडे चेअरमन दिलीप धनगर व्हॉइस चेअरमन किशोर कोळी माजी चेअरमन विजय चौधरी, माजी सरपंच प्रतिनिधी खामखेडा रमेश शिरसाठ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीलाल पटेल उपाध्यक्ष श्रीकृष्ण वाडीले, पोलीस पाटील भरवाडे संजय पटेल पोलीस पाटील खामखेडा सागर धनगर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष युवराज धनगर, ग्रामपंचायत सदस्य दुर्गेशभाई पटेल, भरत पाटील,सामाजिक कार्यकर्ते भरतभाऊ राजपूत, दाजभाऊ राजपूत,चतुर कोळी, दिलीप वानखेडे, पालक प्रतिनिधी अमोल धनगर, महेंद्र राजपूत, भैय्या धनगर, प्राचार्य एन सी पवार, पर्यवेक्षक के बी चौधरी,प्रा. एस एम पाटील,मुख्याध्यापक सी.डी.पाटील, बी आर महाजन, ईश्वर पाटील, गणेश साळुंखे, प्रदीप गहीवरे,गोपाल पाटील पत्रकार रमेश ईशी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व नटरंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक आर बी खोंडे यांनी प्रास्ताविकातून सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्देश व थीम याबाबत मनोगत व्यक्त केले समाज प्रबोधन ही आज काळाची गरज आहे आणि म्हणून आमचे विद्यार्थी समाजातील विविध विकृतींवर एक चांगला मेसेज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतील म्हणून पूर्णवेळ कार्यक्रम पाहण्याचे आवाहन मुख्याध्यापकांनी केले शाळेतील 208 विद्यार्थ्यांपैकी 180 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होते स्री भ्रूण, पर्यावरणाचा असमतोल, मोबाईलचा अतिरेक, अंधश्रद्धा अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या नाटक व नकलाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला त्यासोबत नृत्य व गायन या कलाही सादर केल्या यासाठी परिसरातील पदाधिकारी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भरभरून प्रतिसाद दिला व कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले.
