आदिवासी विकास’तर्फे जिल्ह्यात 27 हजार घरकुले : डॉ. विजयकुमार गावित

फुले शाहू आंबेडकर
0
आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून, त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली.
आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून, त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून, जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.
धडगाव तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास सुभाष पावरा, रूपसिंग तडवी, रामा वळवी, हिरालाल पाडवी, रमेश तडवी, मंगेश तडवी, राजेंद्र तडवी, किशोर तडवी, शिवाजी पराडके, लतीश मोरे, चंदू वळवी व पंचक्रोशीतील अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
मंत्री डॉ. गावित म्हणाले, की जिल्ह्यातील ६५ हजार घरांमध्ये वीज पोचावी यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील ५५ हजार घरकुलांना वीज दिली जाणार आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक तेथे फिल्टरही बसविले जाणार आहे. जलजीवन मिशनसाठी वीजबिलाचा प्रश्न उद्‌भवणार नाही.
यासाठी सोलर प्लांटचीही तरतूद आराखड्यांमध्ये करण्यात आली आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश कुटुंबांचे आजोबा-पणजोबांच्या नावावर रेशनकार्ड असून.
त्यामुळे एखाद्या योजनेचा लाभ त्या कुटुंबातील आजोबा-पणजोबाने घेतला असल्यास त्या कुटुंबातील कुणालाही त्या योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे रेशनकार्ड स्वतंत्र बनवून घेणे गरजेचे आहे.
ते म्हणाले, की दवाखाना, शाळा, आश्रमशाळा, ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने आदिवासी दुर्गम भागासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना आणली असून
येणाऱ्या काही दिवसांत या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे दुर्गम भागात आपल्याला पाहावयास मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default