छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षण घेणारा धडगाव तालुक्यातील वाहवाणी येथील युवक अनिकेत टेड्या वळवी (वय २३) हा डिसेंबर महिन्यात गावदिवाळीनिमित्त गावाकडे आला होता. तो २६ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस ओळखीच्याच एका व्यक्तीसोबत दुचाकीने घराबाहेर गेला, परंतु, तो सकाळपर्यंत परतलाच नव्हता. अखेर कात्रीच्या केलवाणीपाडा भागात त्याचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाच्या परिस्थितीवरुन त्याचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनिकेतच्या नातेवाईकांना आला. शिवाय दुचाकी सुस्थितीत होती, सोबत गेलेल्या व्यक्तीला कुठलीच दुखापत झाली नाही व तो घटनेनंतर मृताच्या घरी गेलाच नव्हता. त्यामुळे संशयात भर पडली. या संशयापोटी अनिकेतचा मृतदेह त्यांचे हल्लीचे गाव वेरी तालुका अक्कलकुवा येथे मिठात पुरत केल्ला सिंगा वळवी, खेमसिंग सिंगा वळवी, रघुवीरसिंग सिंगा वळवी, दिवान तेजाला वळवी, नवसा बावा पाडवी व सिंगा बावा पाडवी या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला
